Ad will apear here
Next
गाजलेल्या चित्रकारांची चित्रे झाली ‘जिवंत’
पुणे : गणपतराव म्हात्रे, पाब्लो पिकासो, एडवर्ड मूंच, वैन गो, साल्व्हादोर दाली, फ्रीडा काहलो, लिओनार्डो व्हिन्सी या चित्रकारांची पारंपरिक चित्रे प्रदर्शनात सजीव झाली. यामध्ये महाराष्ट्रीयन स्त्री, द स्क्रीम (किंकाळी) अशा प्रकारच्या अनेक कलाकृती प्रदर्शनात जिवंत होऊन उभ्या होत्या. निमित्त होते ते ‘आर्ट वॉक अँड ग्राफिटी वॉल २०१७-१८’ प्रदर्शनाचे

महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी संचालित ‘स्कूल ऑफ आर्ट अँड आर्ट अ‍ॅकॅडमी’तर्फे ही नाविन्यपूर्ण कल्पना प्रत्यक्षात आली होती. प्रजासत्ताक दिनी या प्रदर्शनाचे उद्घाटन अतिरिक्त पोलिस महासंचालक डॉ. टी. एस. भाल यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ‘एमसीई सोसायटी’चे अध्यक्ष डॉ. पी. ए. इनामदार होते.

या प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी वेशभूषा आणि रंगभूषा करून गाजलेल्या चित्रकारांच्या चित्रांना जिवंत रूप दिले होते. त्यात ऋषिकेश कुचेकर, गणेश आर. पै, शाहीन मिसाळ, क्षितिजा शहा या विद्यार्थ्यांनी चित्रस्वरूप भूमिका केल्या. आकाश लष्करे, अमित ढावरे, शाहीन इनामदार, मंदार जोशी, ओंकार पवार या विद्यार्थ्यांनी रंगभूषा केली होती.

अशा स्वरूपातील प्रदर्शनाची प्रा. महेश निरंतरे आणि कपिल अलास्कार यांची मूळ संकल्पना असून, सुभाष खंडाळे, भारत लोंढे आणि  हेमा जैन यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले होते.

या वेळी संस्थेच्या उपाध्यक्ष आबेदा इनामदार, सचिव लतीफ मगदूम, सहसचिव इरफान शेख, ‘स्कूल ऑफ आर्ट अँड आर्ट अ‍ॅकॅडमी’च्या संचालक हेमा जैन, प्राध्यापक, शिक्षक उपस्थित होते.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/YZNXBK
Similar Posts
‘अँग्लो उर्दू’ शाळेच्या प्रकल्पाची निवड पुणे : ‘शिक्षणाची वारी प्रकल्पांतर्गत महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या अँग्लो उर्दू बॉईझ हायस्कूलच्या प्रकल्पाची निवड पुणे विभागीय स्तरावर झाली आहे,’ अशी माहिती मुख्याध्यापक परवीन शेख यांनी ही माहिती दिली.
प्रजासत्ताक दिनी आझम कँपसमध्ये कार्यक्रम पुणे : प्रजासत्ताक दिनानिमित्त महाराष्ट्र कॉस्मोपॉलीटन एज्युकेशन सोसायटीच्या आझम कँपसमध्ये अतिरिक्त पोलीस महासंचालक डॉ. टी. एस. भाल यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याचे उदघाटन पुणे : महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या (एमसीई) स्पोकन इंग्लिश अ‍ॅकॅडमीतर्फे मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याचे उद्घाटन झाले. आझम कॅम्पस येथे आयोजित या कार्यक्रमाचे उदघाटन बडोदा येथे होणार्‍या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉ. लक्ष्मीकांत देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले
प्रजासत्ताक दिनी ‘आर्ट वॉक अँड ग्राफिटी वॉल’ प्रदर्शन पुणे : महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या ‘स्कूल ऑफ आर्ट अँड आर्ट अ‍ॅकॅडमी’तर्फे वार्षिक ‘आर्ट वॉक अँड ग्राफिटी वॉल २०१७-१८’ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language